कोरोना @ १६०

Foto
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १६० रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७८३२ वर जाऊन पोहचली आहे. 

आज सकाळी आलेल्या अहवालात १६० रुग्णांमध्ये ८६ पुरुष आणि ७४ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ७८३२ रुग्णांपैकी ४१६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ३३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या ३३३२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

शहरात १२१ रुग्ण
आजच्या अहवालात शहरात १२१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात हर्सुल १, आंबेडकरनगर १, घाटी परिसर २, विवेकानंद हॉस्पीटल परिसर १, ज्युबली पार्क, भडकलगेट १, मयूर पार्क, हडको ४, गणेशनगर १, जय विश्वभारती कॉलनी २, कोकणवाडी २, शिवाजीनगर ४, बीड बायपास १, रमानगर १, भारतनगर १, सातारा परिसर ९, उत्तमनगर ६, शिवशंकर कॉलनी ९, गजानननगर २, मातोश्रीनगर ३, मयूरपार्क ११, पदमपुरा १, छावणी १, ज्योतीनगर २, चिकलठाणा २, बंजारा कॉलनी १, ठाकरेनगर १, एन दोन सिडको १, एन सहा सिडको ४, एन बारा सिडको १, विठ्ठलनगर २, संजयनगर, मुकुंदवाडी १, सुरेवाडी १, म्हाडा कॉलनी १, कैलासनगर ३, जय भवानीनगर १, विजयनगर १, विष्णूनगर, आकाशवाणी परिसर १२, जरीपुरा १, मोंढा नाका १, टीव्ही सेंटर १, नागेश्वरवाडी ६, फिरदोस गार्डन् परिसर ३, शिवाजीनगर, गारखेडा १, पुंडलिकनगर १, लक्ष्मी कॉलनी १, आंबेडकरनगर २, भावसिंगपुरा २, शिव रेसिडन्सी, उल्कानगरी १, आदर्श कॉलनी, गारखेडा १, पीरबाजार, उस्मानपुरा १, इतर १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत. 
ग्रामीण भागात ३९ रुग्ण
ग्रामीण भागात आज ३९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात विश्व विजय सोसायटी बजाजनगर १, पियूष विहार बजाजनगर १, भगतसिंगनगर, बजाजनगर ४, गुरूदेव सोसायटी मुंडे चौक, बजाजनगर १, गुरूकृपा सोसायटी मुंडे चौक, बजाजनगर १, द्वारका नगरी, बजाजनगर १, रांजणगाव शेणपुजी, बजाजनगर १, बजाजनगर २, छत्रपती नगर, बजाजनगर २, रांजणगाव, बजाजनगर १, जिजामाता सोसायटी बजाजनगर १, वंजारवाडी १, कल्पतरू सोसायटी पटीयाला बँकेजवळ १, गजानननगर १, स्वर्णपुष्प सोसायटी बजाजनगर १, संत कॉलनी, वाळूज १, शिवालय चौक, बजाजनगर १, गणेश सोसायटी बजाजनगर १, हतनूर, कन्नड ७, मनिषानगर, वाळूज १, मातोश्रीनगर, रांजणगाव २, जामा मस्जिद जवळ, वाळूज १, ओम साईनगर, कमलापूर २, जवखेडा खु. ता. कन्नड १, उंबरखेडा, कन्नड १, जदगाव, करमाड १ या भागातील कोरोनाबाधित आढळून आले आहेत.